हो .. मी एक स्त्री पण आधी एक व्यक्ती आहे
हो.. मी रडते पण मला कराटे शिकायला सुद्धा आवडतात
हो.. मी एक पालक, पण माझ्यात देखील एक मूल दडलेल आहे
हो...मी मुलांना शिकवते, वळण लावते पण त्यांच्याकडून शिकायला , समजून घ्यायलाही मला आवडते
हो... बरोबर काय चूक काय मी जाणते पण कधी हळूच खोडकरपणा मलाही करावासा वाटतोच की
हो.. मी एक वकील पण माझी देखील काही कैंफियत असु शकते
हो... मी शिकलेली पण बुद्धिबळ नव्याने शिकायला कुठली पायरी असते
का आपण काही नात्यांना, वयाला, शिक्षणाला एखाद्या चौकटीत बसवतो??
का नाही आपल्या आजूबाजूचे लोकं, चुकू देखील शकतात ही शक्यता स्वीकारत??
बहीण अशी, भाऊ तसा, आई-वडील, शिक्षक, नवरा, मित्र-मैत्रिणी सगळा नात्याने भरलेला आजूबाजूचा परिसर , तो असा म्हणजे असाच आणि तसा म्हणजे तसाच असावा हा अट्टाहास असतो आपला?
कोशिंबिरीची चव अशीच, इडली गोलच, आमटी तशीच, भाजीत मसाला इतकाच, वरणात गूळ तितकाच , थालीपीठ भाजणीचच, पोळी घडीचीच, अमक्यात लसूणच, तमक्यात कांदाच , फलाण पातळ, बिस्ताण घट्टसर ... किती ह्या चौकटी.
घराचेही असेच ... दिवाणखाना सभ्य , स्वयंपाकघर महिलाराज , अंगण लेकुरवाळ, पुस्तकांची खोली धीरगंभीर ... एखादं दिवशी पुस्तकांच्या कपटाने मारल्या गप्पा, घातला धुडगूस तर कुठे बिघडते? दिवाणखान्याने लोळून बघितला सिनेमा तर काय होते? स्वयंपाक घर एखादवेळी पुरशी राकटपणा सहन करेल तर काय होईल? अंगणात तरुण पोर पत्त्यांचा डाव मांडतील तर काय बहर येईल?
सतत हे असं(च) आणि ते तस(च) चा अट्टाहास का ? चौकट मोडून बाहेर जाणं वाईटच हे कोणी ठरवलं? आणि हो, चौकट लांघली तर नाव ठेवणारा समाज नेमका कुठे राहतो? एखादं मूल जन्माला येणं किती आनंददायी ... मग मुलगी की मुलगा का विचारलं जात असावं? पालक, डॉक्टर, वकील, कलाकार उभयलिंगी मग नावामागे मिसेस किंवा श्रीमती लावण्याचा हट्ट का? जाती संपवा म्हणत असताना, जातीनिहाय मोर्चा काढण्याचे प्रयोजन काय? सायकल लहानपणीच चालवली पाहीजे, मोठेपणी काय सायकल ला गंज लागतो का??
- एक प्रचंड (शंकेखोर) मन
( तीच पहिल्यापासून असंच आहे, सरळ काहीच हीला पटत नाही... चहाटळ कुठली)
#चहाटळ.कॉम
No comments:
Post a Comment