लोकशाहीचा चौथा स्तंभ ..
खिळखिळीत झाला आहे का ?? की कुठल्या एखाद्या (अ)राजकीय खिळ्यावर अडकून पडला आहे ?? जगात कोरोना आहे ... मान्य. पण फक्त कोरोनाच आहे असे नाही. बाकी जग पूर्वी होते तसेच आहे, त्यात फक्त कोरोनाची भर पडली आहे. समजतंय का तुम्हाला हे?? की समजत असून पण समजून घ्यायचे नाही असे ठरले आहे ??
कोरोनाच्या बातम्या द्या ना ... जरूर द्या. नव्हे दयायलाच हव्यात. पण किती वेळ आणि किती वेळा ?? तुम्हाला बातम्यांचे एक वेळापत्रक नाही का ठरवता येत ?? दिवसभरातले 2 तास, सकाळी एक आणि संध्याकाळी एक, कोरोनासाठी ठेवता येतील. उरलेल्या वेळात जरा उर्वरित विषयांबद्दल बोलता येणार नाही का ?? की धडधाकट लोकांना कोरोनाने नाही पण त्याच्या विचारांनी घाबरवून हृदयविकाराने परलोकी पोहोचवूयात नाहीतर नैराश्याने ग्रासवूयात असा काही विचार आहे तुमचा ?? की विचारशक्ती कुंठित झाली आहे तुमची ?? की क्रय शक्ती संपुष्टात आली आहे ??
'ब्रेकिंग न्यूज' ची पण जमले तर एखादी 'योग्य' व्याख्या बनवा. आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. अभ्यास म्हणून मागच्या महिनाभरातल्या सगळ्या 'ब्रेकिंग न्यूज' पुन्हा एकदा बघा. ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली काय काय खपवले आहे त्याचा जरा खरोखरच आढावा घ्या. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा 'लोक आज घरात अडकले आहेत, तेही थोड्या काळाकरीता, कायमचे नाहीत'. आज त्यांच्याकडे पर्याय नसेल दूरचित्रवाणी बघण्याशिवाय, पण ही परिस्थिती कायम रहाणार नाही आहे. उद्या 'कोणी प्रेक्षक देता का प्रेक्षक' अशी भीक मागायची वेळ तुमच्यावर येऊ शकते ह्याची जाणीव ठेवा.
गरजवंत आणि गरजेला धावून जाणारे सगळ्यांचीच तुम्ही बातमी करतात ना ?? मग त्यांच्या मधला दुवा होण्याचा का नाही प्रयत्न करत?? 'इथे हे नाही आणि तिथे ते नाही' अशी बोंबाबोंब करण्यापेक्षा जिथे ते मिळू शकते किंवा जे ह्या गैरसोयीनसाठी मदतीचा हात बनून पुढे येऊ इच्छितात त्यांच्यापर्यंत ती गैरसोय नेऊन त्या दोन दुव्यांना का नाही जोडायचा प्रयत्न करत ?? जेथे अन्नाची नासाडी होते, तेथे का नाही कमतरता असलेल्या विभागांची माहिती पोहोचवली जात ?? पूर्वी काहीही बातमी कळाली की खातरजमा करण्यासाठी पत्रकारांना किंवा वृत्तपत्र कार्यालयात फोन केला जात असे. आज ती विश्वासार्हता बरकरार राहिली आहे ??
वृत्तवाहिनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक सर्वेक्षण करावे. तुमच्या घरातील, ओळखीतील दहा(१०) आठवी ते बारावी आणि बारावी ते पदवी मध्ये शिकत असलेल्या मुलांना प्रश्न विचारावा की ती मुले तुमची किंवा कोणतीही, कोणत्याही भाषेतील वृत्तवाहिनी बघतात का ?? नाही उत्तर असेल तर 'का' ?? तुमचे तुम्हाला उत्तर मिळेल. काय कार्यक्रम आहेत तुमच्याकडे ह्या मुलांसाठी ?? त्याच त्याच (अ)राजकीय बिनडोक चर्चांचा तुम्हाला कंटाळा नाही आला ?? काहीतरी वेगळे करावे असे नाही वाटत तुम्हाला??
बर चला, जरावेळ असे गृहीत धरू की तुमच्या वाहिनीचा एक ठरलेला कार्यक्रम असतो तुम्हाला त्यातच नाचावे लागते. कलाकार आणि विषय तरी बदला ना त्या नाचकामाचे. थोडा दर्जाचा कधीतरी विचार करा. काय हरकत आहे रात्री दहा(१०) ते अकरा(११) वीस(२०) ते तीस(30) वयोगटाच्या तरुणांसाठी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाची आखणी करायला?? रात्री नऊ(९) ते दहा(१०) आठवी ते बारावीतल्या मुलांसाठी राखीव ठेवायला?? कार्यक्रमाची आखणी म्हणजे एखादा प्रौढ प्रज्ञावंत बोलावून त्याने मुलांना कारकीर्द, व्यवसाय ,इ विषयांवर बोलून कंटाळा आणणे नव्हे. मुलांना येऊ देत ना समोर, त्यांना बोलू देत त्यांच्या मनातले. मुलांनी मुलांसाठी मुलांचे कार्यक्रम असे कार्यक्रमाचे स्वरूप का असू शकत नाही ?? सतत कंटाळवाण्या लांब चेहेऱ्याच्या लोकानी येऊन अक्कल शिकवणे म्हणजे चांगला कार्यक्रम ?? ही व्याख्या बदलण्याची वेळ आली आहे. नाही बदललात तर ही तरुण पिढी वृत्तवाहिनीला पर्याय शोधायला जराही मागेपुढे पाहणार नाही.
आणि हो, 'सूत्रां'च्या नावाखाली वेड्यात काढण्याचे लाजिरवाणे प्रकार जमले तर थांबवा. खणखणीत खरी बातमी देता येत असेल तर द्या म्हणजे सारखा 'सूत्रां'चा बुरखा पांघरण्याची गरज भासणार नाही. वाहिन्या बदलत असताना चुकून वृत्तवाहिनी दिसली तर अजीर्ण होऊन उलटी होते की काय असे वाटण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुमचा प्रवास. 'जब गीदड़ की मौत आती है, तो वो शहर की ओर भागता है' ह्याचा अर्थ असा , जेव्हा एखाद्यावर वाईट वेळ येणार असेल तर ती मुसीबत, ती वाईट वेळ त्याला आपल्याकडे बोलावून घेते. सध्या तुमचे काहीसे असेच झाले आहे.
कळावे, लोभ असावा.
- ॲड. स्वाती आवटी दीक्षित
#पत्रकार #पत्रकारिता #वृत्तवाहिन्या #बातम्या

No comments:
Post a Comment