सुंदर मी होणार ..
पण कोणते सुंदर ????? चेहेऱ्याने सुंदर की रंगाने सुंदर की व्यक्तित्वाने सुंदर की विचाराने सुंदर की माणुसकीने सुंदर की मैत्रीने सुंदर की नात्याने सुंदर की कपड्याने सुंदर की पैशाने सुंदर की रंगरंगोटीने ने सुंदर ???
ह्या व्यतिरिक्तही कितीतरी विविध प्रकारचे सुंदर लोक समाजात अचानक धडकून जातात. रूढार्थाने ते सुंदर नसतीलही पण त्यांचे अस्तित्व इतरांसाठी सौंदर्य निर्माण करून जाते. कधी एखाद्या ओळखीच्या काकू , कधी मैत्रीण, कधी शेजारी, कधी नातेवाईक, कधी डॉक्टर, कधी सहाध्यायी, कधी एखादे शहर , कधी प्रसंग, कधी एखादी धून, कधी गाणे , एखादा निरोप, एखादा दूरध्वनी, एखादी मालिका, एखादे नाटक, पुस्तक, चित्रपट.... आपले क्षण सुंदर करून जातात. चांदनासारखे स्वतःचा सुगंध नकळत दुसऱ्याला देऊन जातात.... असा सुगंधित सुंदर दरवळ बनू का ??
जेव्हा आपण म्हणतो, मला एखादी सुंदर मैत्रीण हवी तेव्हा 'सुंदर' चा काय अर्थ अपेक्षित असतो ? सुंदर शेजार मिळावा , मुलीला सुंदर सासर मिळावे, मुलाला सुंदर जोडीदार मिळावा, मुलांना सुंदर शाळा मिळावी, एखादे सुंदर घर घ्यावे, गाडी सुंदर चालवावी, गाणे सुंदर म्हंटले, वाद्य सुंदर वाजवले, बाग सुंदर फुलली, रस्ता सुंदर बांधला, प्रवास सुंदर झाला, खेळ सुंदर रंगला, कपडे सुंदर घेतले वा घातले, झोका सुंदर दिला, आकाश सुंदर दिसले, चंद्रकोर सुंदर सजली, वारा सुंदर सुटला, पदार्थ सुंदर झाला, गंध सुंदर दरवळला, सुंदर चित्र काढले, फोटो फारच सुंदर आला.... प्रत्येक वेळी सौंदर्याचा अर्थ निराळा. कधी चांगला, कधी सुरेल, कधी वळणदार, कधी योग्य, कधी बहारदार, कधी रंगीत, कधी झोकात तर कधी दरवळ... नेमके काय व्हायचे आहे मी ??
झाला गोंधळ.. नेमके कोणते सौंदर्य अपेक्षित असते, जेव्हा लोक म्हणतात , 'अशी का रहातेस, जरा सुंदर रहात जा'. म्हणजे नेमके काय राहायचे ?? ... सुंदर मैत्री करायची,सुंदर गप्पा मारायच्या, सुंदर नाती निर्माण करायची , सुंदर पदार्थ करून खाऊ घालायचे की नुसतच सुंदर कपडे घालून, नटून थटून मिरवायचे. असे राहणे ही काही वाईट नाही, जमतेही काही लोकांना. पण सगळ्यांनाच जमेल असे नाही ना. असतात काही आपल्या सह्याद्री च्या रांगांसारखे रांगडे , काटक , ओबडधोबड. तरीही गिर्यारोहकांना दिसतोच की तो विंध्यकडा सुंदर ... डौलदार.
... असा डौल आणू का व्यक्तिमत्वात?
सुंदर शास्त्र, सुंदर अस्त्र, सुंदर आरोग्य, सुंदर समाज, सुंदर रीती-रिवाज, सुंदर चांदणे, सुंदर लिखाण ,सुंदर खेळ, सुंदर हास्य, सुंदर बोलणे, सुंदर चालणे, सुंदर देखावे, सुंदर काम, सुंदर दाम, सुंदर नाती, सुंदर मैत्री, सुंदर प्रेम आणि सुंदर राहणीमान .... सगळा सौंदर्याचाच खेळ .... नेमके काय जमेल बरे ह्यातले ??
कठीण आहे 'सौंदर्य' ... कळायला आणि वळायलाही. 'पी हळद आणि हो गोरी' इतके काही सोप्पे नाही. जमेल असे काही वाटत नाही.
"वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकीन,
उसे एक 'खूबसुरत' मोड देकर छोडना अच्छा"
खूबसुरत म्हणजे सुंदर :)
कळावे, लोभ असावा
- ॲड स्वाती आवटी दीक्षित

No comments:
Post a Comment