पराधीन आहे जगती
पुत्र मानवाचा...
निमित्त: इरफान खान.
वर्तमानपत्र उघडले की रोज दोन(२) ते तीन (३) तरी बातम्या अकाली मृत्यूच्या वाचनात येतात. मध्ये एका आशिलाचा फोन होता,पंधरा (१५) दिवसानंतरची तारीख घ्या, सुनेचे बाळंतपण करून घ्यावे लागले, बाळ गेल.
कोणाचे लहान मुलं, कोणाचे वडील, कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाचा तरुण मुलगा, कोणाची कोवळी मुलगी तर कोणाचा लहान भाऊ. का? जगात जगण्याचे ओझे झालेले कित्येक वृद्ध आहेत, त्यांना पूर्णविराम द्यायची मनापासून इच्छा आहे .पण प्रदीर्घ आयुष्याचा शाप त्यांची सुटका होऊ देत नाही. आणि ज्यांनी अजून स्वप्न अनुभवली, उपभोगली, साकारली नाहीत, कित्येकांना तर स्वप्नांचा , आयुष्याचा अर्थही नीटसा उमगला नाही त्यांनी मात्र परतीच्या प्रवासाला मार्गस्थ व्हावे?? आणि मागे राहिलेल्यांचे काय ?? अश्वथाम्याच्या कपाळावरच्या जखमेसारखे भळभळणारे आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत धडपडायचे...... आयुष्यभर??
अशा प्रसंगी प्रतिक्रिया देण्याचा कोण उत्साह असतो लोकांना. जाण्याऱ्याने कशी घाई केली ज्याण्याची त्याच्या जास्त घाई आम्ही करणार त्याला श्रद्धांजली वाहण्याची... आणि ह्या अशा प्रेमाने ओथंबलेल्या बिनडोक लोकांच्या मूर्ख प्रतिक्रियांनी समाजमाध्यम वाहू लागतात. हाही विचार नसतो की जाणार्याचे नातेसंबंध दूर परदेशी असतील, त्यांना माहीत तरी आहे का गुदरलेला प्रसंग? त्यांच्याकडे दिवस आहे की रात्र? अशा पद्धतीने समाजमाध्यमांवर आपल्या कोण्या सख्ख्याला अचानक श्रद्धांजली वाहिलेली पाहून तिच्यावर काय प्रसंग ओढवू शकतो? कोणीतरी ऑफिस ला निघालेली व्यक्ती सिग्नल ला गाडी थांबली म्हणून फोन कडे नजर टाकेल आणि आपल्याच कोणाच्या आयुष्याशी झालेला खेळ तिला भर रस्त्यात कळेल तर तिची काय अवस्था होईल??
नातेसंबंध तर अशा वेळी फाशीच्या फंदा सारखी असतात. कोणाला मागे सुटलेल्या स्थावर जंगमचा मोह तर कोणाला मागे उरलेल्यांच्या जबाबदारीच ओझं. जाणारा कसा माझ्याच जवळचा होता हे सांगण्याची कुठे चढाओढ, तर कुठे 'अमच्याशिवाय आता ह्यांचे कोण' चा अहंभाव. सल्ला-मसलतींना तर इतका जोर आलेला असतो की मागे रहाणाऱ्यांचे मन 'आपणही का सुटलो नाही' चा आक्रोश करत रहाते. कोणी म्हणत 'मागच्या जन्माचे भोग' , कोणी कर्माचा सिद्धांत मांडते. नऊ महिने पोटात वाढणाऱ्या त्या अर्भकाचे, तीन (3) महिन्यांच्या त्या इवल्याशा जिवाच्या कर्माचे कोडे मात्र सुटता सुटत नाही. काय दोष त्या निरागस देवदूतांचा? प्रश्नाला उत्तर मिळत नाही. कोणा-कोणाच्या मागच्या जन्माचे भोग? जाणार्याच्या, त्याच्या पोटी जन्माला आलेल्यांच्या, त्याच्या जोडीदाराच्या, त्याला प्रसावलेल्यांच्या की त्याच्या सहोदरांच्या??? असे तर नाही की परमेश्वर 'भोग' भोगणाऱ्यांचे गठ्ठे करून एकत्रच ह्या जन्मी जन्माला घालत?? आणि सांगतो 'भोगा आता एकत्रच सगळी फळ'. न्यायचेच होते तर गर्भाशयाच्या अंधार कोठडीची नऊ महिन्याची शिक्षा का ?? त्या मातेच्या भांवनांशी खेळ का ?? हिरावूनच न्यायचे होते पितृसुख तर जन्म देण्याची घाई का ?? नंद पुत्र म्हणून वाढणार होता कान्हा तर वसुदेवाच्या पोटी जन्म का ??
दुःख विसरता येत नाही पण आयुष्याचा जोडीदार गेला ना तर पुढच्या वळणावर पुन्हा आयुष्य सुरू करण्याचा उ:शाप तरी आहे. पण ज्यांनी जन्म दिला , ज्या भांवंडात तो जीव वाढला त्यांनी कुठे जायचे?? कुठे शोधायचा तो हरवलेला कोन?? कसे संधायचे ते निखलेले दुवे?? ना फाटलेले आकाश जगू देत ना आजूबाजूचा समाज. 'लवकर सावरलात त्या मानाने तुम्ही' 'बर झालं बाहेर पडलीस'. काय प्रतिक्रिया द्यायची ह्या आणि अशा अनेक उदगारांना. अहो तुम्हाला दिसतेय ना ती फक्त खपली आहे, आत अश्वथामा ठसठसतोय हो तसाच.... तहेहयात.
कळावे, लोभ असावा
- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:
Post a Comment