आई ची माया
अन पोर जायला वाया ..
'आई ,तू एकदम दुष्ट आई आहेस , लोकांची आई अशी नसतेच ... नुसती हिटलर'.
लेकीच्या तोंडून हे वाक्य ऐकले की स्वतःचाच राग यायचा, किती मागे लागतो आपण तिच्या असेही वाटायचे. थोडे बदलूयात का, थोडी दयाळू प्रकारातली आई होण्याचा प्रयन्त करूयात का असेही वाटायचे. पण एकदा माहेरी गेले असताना TV वर एक सीरिअल पाहण्यात आली. त्यातील 'बबड्या' पाहिला आणि बदलण्याचा विचार पार लांब पळून गेला. आपल्या मुलीचा 'बबड्या' होता काम नये. मी 'चांगली / दयाळू / TV वर जाहिरातीत दाखवतात तशी आई नाही झाले तरी चालेल पण माझी मुलगी उत्तम व्यक्ती झालीच पाहिजे.
एक थोर तबलजींच्या बाबतीत एक प्रसंग ऐकला होता . त्यांना जेव्हा विचारण्यात आले की आयुष्यात इतके यश मिळवल्यावर आता काय मिळवायचे राहिले ? त्यांनी एका सेकंदात उत्तर दिले ,माझ्या वडिलांची शाबासकी.
त्या थोर कलाकाराच्या वडिलांना, जे स्वतः उत्तम कलाकार आहेत, जेव्हा ह्या उत्तराबाबत सांगण्यात आले आणि विचारले ,तुम्ही तुमच्या मुलाला शाबासकी देत नाहीत का? त्याचे कौतुक करत नाहीत का ? त्यावर त्यांनी फार सुंदर उत्तर दिले होते , एक कलाकार म्हणून मला त्याचे कौतुक आहेच पण एक बाप म्हणून मी त्याची स्तुती करू शकत नाही. ज्या दिवशी मी त्याची स्तुती करेल , त्याची प्रगती थांबेल. म्हणून मी फक्त त्याच्या चुकांसाठी त्याचा कान पकडणार परिणामी संपूर्ण जग त्याचे कौतुक करणार.
आपल्या आजूबाजूला कितीतरी असे आई वडील असतात जे त्यांच्या मुलांच्या अखंड प्रेमात / कौतुकात असतात. कौतुक जरूर करावे, पण मुलांना फक्त प्रोत्साहन मिळेल इतकेच करावे. मुलांच्या देखतच सतत त्यांच्यावर कौतुकाचा भडिमार केला की त्या मुलाची ऐकण्याची, समोरच्याचे म्हणणे मान्य करण्याची सवय हळू हळू थोडी कमी होत असावी. त्यामुळेच की काय बहुदा लहान वयात उत्तम वागणारी , हुशार , कल्पक मुले मोठेपाणी कुठेतरी गर्दीत हरवून जातात. मग हेच पालक 'लहानपणी त्याला(तीला) सगळ्या गोष्टींची आवड होती, सगळ्यात भाग घ्यायचा(ची), आता मात्र काहीही करत नाही', इ. बोलताना आढळतात.
व्हॉट्स ऍप वर एकदा 1 मेसेज आला होता . दोन शेजारी शेजारी घरे होती , दोघांकडेही छान बाग होती. एका घराच्या बागेला भरपूर पाणी घातले जायचे आणि दुसऱ्या घरातल्या बागेला मात्र अगदी गरजेपुरते पाणी मिळत असे. एकदा वादळात पहिल्या घरातली बाग संपूर्ण उध्वस्त झाली पण दुसऱ्या घरातल्या बागेचे फारसे काही नुकसान झाले नाही. शेजारी चौकशी करायला आले , तेव्हा दुसऱ्या घरातून त्यांना माहिती मिळाली की ते झाडांना जेवढे गरजेचे होते तेवढेच पाणी घालायचे , त्यामुळे जास्तीच्या पाण्यासाठी त्या झाडांची मुळे जमिनीत खाली खोलवर जात राहिली , त्यामुळे झाडांचे मूळ आणि खोड पक्के झाले व वादळाला तोंड देऊ शकले. जेव्हा की पहिल्या घरात बागेला भरपूर पाणी मिळत असल्याने मुळाना जमिनीत खाली खोलवर जाण्याची गरजच भासली नाही ,परिणामी एका वादळात सगळी झाडे समूळ उन्मळून पडली.
मुळे काय आणि मुले काय , पाया भक्कम असेल तर चांगले वाढतील आणि बहरतीलही. आपल्याला तरी दुसरे काय अपेक्षीत असते. सर्व कौतुकाच्या कडबोळ्याना , लाडोबांना आणि शेंडेफळांना बहारदार शुभेच्छा !!!
कळावे, लोभ असावा.
-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:
Post a Comment