देवाशप्पथ खरं सांगेन,
खोटं सांगणार नाही ...
काल माझ्याकडे काम करणाऱ्या पैकी एक जणा(णी)चा फोन आला होता , 'कामावर येऊ का, घरी '........' काही जमू देई ना, अगदी कंटाळा आणला आहे'. '......... ' ती किंवा तो कोणीही असू शकते/तो. जरा आजूबाजूला बघितल्यावर माझ्या लक्षात आले ,अरे असे तर बरेच लोक आहेत आजूबाजूला.
'कोरोना के साईड इफेक्टस' असे शीर्षक द्यायचे मनात होते, पण सगळं खरं लिहिता येईल का ? असे वाटून आधीच शपथविधी उरकून टाकला ( पहाटे पहाटे नाही बरका).
ह्या एका फोन ने एक प्रश्न-कीडा दिवसभर भुणभुण करत मागे लागला, खरच 'असे' लोक ज्या ज्या कुटुंबात असतील त्यांनी काय करायचे ?
असे म्हणजे 'धरलं तर चावत, सोडलं तर पळत' प्रकारातले.
जसे काही घरी बसायला , घरचेच अन्न गिळायला( आपण खातो, पण हे गिळतात), इतर अनेक उत्तमोत्तम(?) आवडी (की सवयी) ना मनासारखा न्याय न देता येणं , इच्छा नसताना सतत घरातल्यांचे अत्यंत वाईट चेहरे बघायला लागण , TV वर त्याच त्याच बातम्या लागण , एकही मनासारखी सिरीयल किंवा सिनेमा न लागण हे सगळे 'त्या' व्यक्तीच्या घरातल्यांची कटकारस्थान आहेत असेच त्यांना वाटत असणार. कोरोनाला आमंत्रण द्यायला पण 'ह्यांच्या' घरातलेच लोक गेले होते. शिवाय चीन बरोबर संगनमत करून कोरोना ह्या घरातल्या लोकांच्या सांगण्यावरूनच तयार करून भारताच्या दिशेने सोडला होता. खरे तर ह्या अशा बदमाश घरातल्या लोकांना मोदी सरांनी फासावर लटकवायला पाहीजे अशीच ह्या '.......' ची इच्छा असणार.
लिहायला , वाचायला गम्मत वाटतेय पण खरच ज्या घरात अशा प्रवृत्तीचे लोक असतील त्यांची काय मानसिक ओढाताण होत असेल ?
घरात कणभर मदत नाही , उलट सतत 12 ते 15 तास TV , अधून मधून विश्रांती घेत असलेला फोन एरवी सतत उरीपोटी कवटाळलेला, काहीही क्षुल्लक कारण काढून दिवसातून 2 ते 3 वेळा उंडारून येणे ( TV वर तुम्ही काहीही सांगा , कितीही WA मेसेज पाठवा , आम्ही नाही ऐकणार तर नाहीच ऐकणार . कारण .... आम्हाला काही होत नाही. शिवाजी , संभाजी , कोरोना शेजारच्याच घरात जन्माला येणार. उगा डोकं नका खाऊ)
( 'शिवाजी जन्मावा शेजारच्या घरी' अशी म्हण आहे म्हणून 'महाराज' बिरुदावली लावलेली नाही, नाहीतर दीक्षित आडनाव आणि महाराजांचा नावाने उल्लेख ,असे जर राजकारण केले तर कोरोना गेला उडत, घरात घुसून कोथळा काढेन)
स्वतःची नाही , घरातल्यांची नाही ,समाजाची नाही तर देशाची काळजी कुठून असणार 'ह्या' बेजबाबदार लोकांना? 'ह्यां' अशा लोकांमुळे एखाद्याच्या घरात कोरोना आला तर त्या घरातल्या सगळी खबरदारी घेणाऱ्या मंडळीनचा काहीही दोष नसताना बळीच ना ? बळी म्हणचे वरचे तिकीट नाही हो, पण त्या महाग टेस्ट, हॉस्पिटल , isolation ( विलगिकरण) , घरातले बाहेरचे सांभाळण्याची सर्कस म्हणजे बळीच नाही का ?
माझे PM सर आणि CM सरांना विचारणे आहे ,ह्या अशा प्रवृत्तीनसाठी काही उपाययोजना केली आहे की नाही ? कोणत्या कलमाखाली कुठल्या पो.स्टे. ला तक्रार द्यायची ? की डायरेक्ट टकमक टोकावरून कडेलोट की हत्तीच्या पायी की तोफेच्या तोंडी ??
आरोग्य मंत्र्यांशी बोलावं की CP सरांना फोन लावावा ?? असा विचार मगापासून मनात येतोय .....
पण ते फक्त कोरोना कुठवर आला विचारण्यासाठी, त्याचा ह्या post शी काही सम्बन्ध नाही.... देवा शप्पथ!
आणि हो तुमच्या आमच्या ओळखीच्या कोणाला ह्या लेखात शोधायचा प्रयत्न करू नका , नातेवाईक आणि मित्रपरिवाराने तर नाहीच नाही, करण काही संबंध नाहीच आहे तर सापडणार कुठून.
खरंच ...
आधीच शपथ घेतलीये , खर सांगेन खोटे सांगणार नाही.
एप्रिल फुल कधी आहे रे भावा ...
कळावे , लोभ असावा

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित
No comments:
Post a Comment