गाढव मेल ओझ्यान
अन शिंगरू हेलपाट्यान ..
'कोणासाठी करतोय ते सगळं? 'तुमच्या' साठीच ना?' साधारण हे वाक्य पुरुषांच्या तोंडून बरेचदा ऐकायला येते . इथे 'तुमच्या' च्या व्याख्येत येतात ते फक्त 'बायको आणि मुले'. अपवाद वगळता स्त्रिया अशी प्रतिक्रिया देताना फारशा दिसत नाहीत. ज्यांच्यावर कुटुंब प्रमुख म्हणून उभे राहण्याचा प्रसंग आला आहे, अशा स्त्रिया देखील 'कुटुंबासाठी उभे राहणे माझी जबाबदारी आहे, ते माझे कर्तव्य आहे, मी नाही तर कोण करणार?' अशी संयत प्रतिक्रिया देताना आढळतात.
सध्या निसर्गाने धक्का मारून 'तुमच्या' म्हणजे आपल्या कुटुंबाच्या सहवासात रमण्याची संधी दिली असताना हे तमाम कुटुंबप्रमुख पोलिसांचा मार खायला घर सोडून सारखे बाहेर का पळत असतात? सगळ्या वृत्तवाहिन्या आणि त्यांचे 'सूत्र' ह्यांचा हवाला देऊन हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. नव्यान्नव (९९) टक्के पुरुष आणि एक (१) टक्का महिला मुशाफिरी करताना दिसतात. त्या एक (१) टक्क्यात पण एकतर घरातले कोणीच बाहेर जाऊन समान आणू शकत नसेल किंवा एकट्या रहात असतील किंवा आपल्या वर उल्लेखिलेल्या 'अपवाद' मध्ये मोडणाऱ्याच महिला असतील.
अंदाजे 20/25 मुली बघून एकीची निवड करण्याचा चोखंदळपणा दाखवून किंवा आकंठ प्रेमात पडून चंद्र-सूर्य तोडून आणण्याची तयारी दाखवून जिच्याशी आयुष्याची गाठ बांधली, नवस-सायास करून किंवा नियोजन करून ज्या सुकुमार(री) ला ह्या भूतलावर आमंत्रित केले, 'कोणी घर देता का घर' अशी मनोमन प्रार्थना करून, बँकेच्या लोन साठी स्वतःला झिजवून जो सर्व सुखसोयीनी युक्त महाल उभा केला, ज्याला स्वतःच्या कल्पनांचा सडा शिंपून सजवले ते सर्व केवळ एका 'रस्त्यावर फेरफटका' मारण्यापुढे नगण्य ठरावे?
आमची आई नेहमी म्हणते 'स्वतःच्या घराचा काय तो कंटाळा?'. हे जर खरे असेल तर ती बायको, मुले, घर, इ सगळे स्वतःचे न वाटता रस्ता, शुकशुकाट आणि पोलिसांचा बांबू जवळचा वाटायला लागला की काय?? अनाहूतपणे एक संधी चालून आली आहे, संधीचे कारण खूपच वाईट आहे, पण ती काही आमंत्रित संधी नाही, सर्वार्थाने 'चालून आलेली' संधी आहे, मग त्या संधीचे सोने का करू नये?? नात्यांचा, रिकामपणाचा आणि घराचा उपभोग का घेऊ नये ?? हवे तेवढावेळ मुलांबरोबर खेळता येते, बायकोबरोबर गप्पा मारता येतात, कितीही वेळ वाचन करता येते, मित्रांना / नातेवाईकांना फोन वर भेटता येते, कौतुकाने घेतलेल्या सोफ्यावर निवांत पाय पसरून बसता येते, सकाळी बेड वर कितीही वेळ लोळता येते, मनात आले की स्वयंपाकघरात जाऊन काही बाही तोंडात टाकता येते, कॅरम,पत्ते, सापशिडी शी परत मैत्री करता येते .... 'सध्या मी खऱ्या अर्थाने आयुष्य उपभोगतो आहे' हे एकदा मनाला समजावून सांगा. कदाचित घरात कंटाळा येणार नाही. त्यातूनही अगदीच रिकामपण ग्रासत असेल तर घरात चिक्कार कामांचे ढीग आहेत , ते उपसायला अर्धांगिनी ला मदत करा, घराचे नंदनवन होईल ह्याची शंभर टक्के (१००%) हमी.
गृहिणी, पोलीस, डॉक्टर आणि त्यांचे सहकारी, सफाईकामगार, बातमीदार, ट्रक चालक, दुकानात काम करणारे कामगार, बँक कर्मचारी, सरकारी नोकर, प्रशासकीय अधिकारी, काही नेते मंडळी, समाजसेवी संस्थांचे कार्यकर्ते जे सध्या नेहमीपेक्षा दुप्पट काम करत आहेत त्यांनी म्हंटले असते 'थोडा बदल हवा, जाम कंटाळा आला' तर समजू शकतो. काहीही न करता, बसल्याजागी कंटाळा येणाऱ्या जमातीला 'शिंगरू' नाहीतर काय म्हणावे ??
अडचणी आहेत ना, भविष्याचे प्रश्नही आहेत, 'किती दिवस आणि पुढे काय' अशी अनिश्चितता देखील आहेच. परंतु बाहेर पडल्याने प्रश्न संपणार आहेत का? बाहेर त्या प्रश्नांची उत्तरे तुमची वाट पहात उभी आहेत का? बाहेर आहे फक्त इतरेजनांना अजून अडचणीत टाकू शकणारी एक 'संधी'.
कळावे, लोभ असावा.
- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:
Post a Comment