मातृ देवो भव ।
पितृ देवो भव ।।
हे वचन थोडे भीतीदायक नाही वाटत ??
मागच्या पिढीचे ठीक होते हो पण आमची पिढी 'देवो भव' प्रकारात मोडायला तयार आहे का ? 'चंगला माणूस' बनतानाच दमछाक होतेय, देव वगैरे कठीणच आहे हो.
एकदा देव म्हंटले की चुकण्याचा अधिकारच संपतो. तुम्ही कायमच बरोबर वागले पाहिजे, वागतात, वागणे अपेक्षीत आहे असाच ह्याचा अर्थ होतो. त्यातूनच 'पालक असून असे कसे वागले' , 'मुलं अशी कशी काय बोलू शकतात', वगैरे वाक्य जन्म घेत असतात.
काय हरकत आहे एखाद्या मुला(ली)ने आपल्या पालकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली तर ? काय हरकत आहे एखाद्या पालकांनी मुलांना 'माझे काही चुकत असेल तर सांगा रे' म्हंटले तर? काय हरकत आहे मुलांनी आपल्या पालकांना ' एक माणूस' म्हणून स्वीकारले तर ?
कारण प्रत्येक पालक पूर्णवेळ पालक नसतो, त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग पालकत्वाचा असतो , बाकी पूर्णवेळ तो एक सर्वसाधारण माणूसच असतो. आपल्याकडे पालकत्वाची कुठे काही शिकवणी पण नसते. जे काही जसे सुचत जाईल , त्या त्या वेळेला योग्य वाटेल , स्वतःच्या पालकांच्या , आजूबाजूच्या लोकांच्या , नातेवाईक , मित्र मैत्रिणींच्या , भावंडांच्या अनुभवातून, सल्ल्यानुसार निर्णय घेतले जातात. कधी कधी तुक्का योग्य लागतो, कधी निर्णय चुकतात. पण म्हणून सगळेच पालकत्व चुकले असे म्हणायचे का ? कुठलेही शिक्षण न घेता , काहीही अनुभव नसताना एका सुंदर लुसलुशीत गोळ्याला आकार द्यायचा , सोप्पे असेल का ? त्यात त्या सुंदर निर्मितीच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडायला होते. ज्याच्यावर नितांत प्रेम करायचे त्यालाच वेळप्रसंगी कठोर होऊन शिक्षा करायची प्रत्येकवेळी जमेलच असे नाही. म्हणून पालक आपल्या मुलांना वाया घालवण्यासाठी असे चुकीचे वागतात असे म्हणणे योग्य ठरेल का? जमतही असेल काही लोकांना सुयोग्य, खंबीर आणि वळणदार पालक बनायला. पण सगळ्यांनाच परमेश्वर हे कौशल्य देईलच असे नाही ना.
कधी कधी तर एकाच पालकांच्या पोटी दोन(2) परस्पर विरोधी टोकाची अपत्ये जन्मला येऊ शकतात. कधी एक यशस्वी एक तुलनेने कमी यशस्वी असू शकतो, एक व्यसनाधीन एक निर्व्यसनी, एक प्रचंड हुशार एकाची पास होताना मारामार, एक मनमिळाऊ एक तुसडा, एक घरकोंबडा एक अत्र-तत्र-सर्वत्र संचार करणारा, एक भित्रा एक शूरवीर. अशा वेळी कसे ठरवणार पालक जिंकले की हारले ? चांगले की वाईट? देव की दानव? पालक वाईट असू शकतात , पाल्य वाईट निघू शकतो ,पण पालकत्व वाईट कसे असू शकेलं? नियमाला अपवाद नक्कीच असू शकतील , पण अपवादांचा नियम नाही होऊ शकत ना.
मुळात पाल्यांचे यशापयश पालकत्वाचे मोजमाप का असावे? किंवा पाल्याच्या यशापयशावर पालकांच्या निर्णयावर , चुकांवर किंवा एखाद्या धोरणावर बोलण्याचा पाल्याचा अधिकार का बेतलेला असावा ? साधारण 8 वी ते 12 वी (प्रत्येकाचे निर्णय घेता येण्याचे वय वेगळे असते) झालेले मूल आणि त्याचे पालक हे एका समांतर पातळीवर येऊन नाही बोलू शकत का? पालकांचा अनुभव, शिक्षण आणि पाल्यांचे नवीन तंत्र , अभ्यास, विचार , ज्ञान , वाटणे , त्यांची मानसीकता हे सर्व एकत्र मिळून निर्णय नाही होऊ शकत का ?
आम्हाला 'देवो भव' म्हणू नका आणि तुम्ही पण 'देवाघरची फुले' वगैरे होऊ नका. तूम्हाला मोठे करण्याचा आनंद आम्ही घेतो, तुम्ही मोठे होण्याचा आनंद घ्या. पालकत्व आणि पाल्यत्व दोन्हीही सुरेख उमलू देत ना. तुम्ही चुकलात तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच. आम्ही चुकलो ....... तर व्हा ना आमचे वाटाडे.
कळावे, लोभ असावा.
-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:
Post a Comment