आलीया भोगासी
असावे सादर ..
आज एका मित्राशी फोनवर बोलत असताना त्याने सहजच सध्य स्थितीवर टिपण्णी करताना म्हंटले 'आलीया भोगासी असावे सादर'. घरात आईच्या हातचे गरम गरम जेवण, हातात वाचायला पुस्तक ( वाचनाची प्रचंड आवड आहे), घरात गप्पा मारायला बरोबरीला आलेला मुलगा , वाटले तर अंगणात जाऊन झाडांना पाणी घालता येते , पाय मोकळे करायला फिरायला आजूबाजूला भरपूर जागा आहे अजून काय हवे एकांतवास मजेत अनुभवायला ?
बर हा मित्र काही पोलीस नाही , डॉक्टर नाही, पालिकेचा सफाई कामगार नाही की पत्रकार नाही. ह्यांच्या पैकी कोणी असे म्हंटले असते तर मान्य होते. आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी सध्या सगळ्याच आघाडीवर लष्कराच्या शिस्तीत ही चतुसूत्री काम करत आहे. लष्कराला तर आपण कायमच गृहीत धरतो. काहीही प्रसंग येवो, लष्कराला बोलावणे हा तर आपला जन्मसिद्ध हक्कच झाला आहे.
आज सहजच एक विचार मनात आला, आपण फक्त काही दिवस ,ते ही आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी एकांतवासात आहोत. पोटाला अन्न , निवाऱ्याला छत्र आहे , कुटुंबाचा सहवास आहे. उलटपक्षी लष्करातील जवान तर नेहमीच त्यांना नेमून दिलेल्या जागी, पुरेश्या सुविधांअभावी , स्वतःच्या जीव धोक्यात घालून, धर्म ,पंथ , जात-पात, समाज ,इ. विषयावर जीवतोडुन वाद घालणाऱ्या , देशसेवेशी काहीही संबंध नसलेल्या आपल्या सारख्या लोकांसाठी, एकप्रकारच्या एकांतवासालाच समर्थपणे तोंड देत असतात ते ही मरणाची टांगती तलवार डोक्यावर घेऊन.
आज जे डॉक्टर्स घराबाहेर पडले आहेत , त्यांना नसेल का भीती संसर्गाची ? त्यांच्या घरी नसेल का कोणी वयस्क , कोणी लहान, कोणी खूप प्रेम करणार ? त्यांना नसेल का वाटत सुट्टी घेऊन घरी बसावे ?
पोलिसांची ची तर गोष्टच निराळी. आपण पोलीस आहोत की 'अल्लाउद्दीन का चिराग' असे वाटत नसेल का त्यांना ?
खूप पाऊस आला ,आपण घरात पण पोलीस मामा बाहेर , अतिरेकी आले ,आपण घरात , मामा बाहेर. निवडणूक, परीक्षा , जयंती ,पुण्यतिथी , दंगल आणि आता तर रोगराई सुद्धा काहीही होवो आपण घरात सुरक्षित रहाण्यासाठी , मामा कायम बाहेर आपले संरक्षण करत.
सफाई कामगार तर एक दिवस आले नाहीत तर अख्खी सोसायटी गडबडते. आता तर फॉरेन रिटर्नड कीडा आला आहे . आपण त्याच्या भीतीने घरात , मग त्याच्या स्वागताला आणि साफसफाईला कोण सामोरे जाणार तर आपले सफाई कामगार मित्र.
सगळ्यात कौतुक आहे ते पत्रकार बंधू भगिनींचे. कोरोनाबाधित व्यक्तीशी बोलताना , त्याच्यासाठी राखीव असणाऱ्या दवाखान्यांना भेट देताना , रस्त्यात उगाच हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारताना, पोलीस - प्रशासन- नागरिक सगळ्यांचा दुवा होताना त्यांच्या मेंदूला नसतील का मुंग्या येत ?
कोणी म्हणेल तो तर त्यांच्या कामाचा भाग आहे .
अगदी बरोबर, आहे ना . हे काम त्यांनी स्वेच्छेनेच स्वीकारले आहे. पण ते त्यांचे काम इमाने इतबारे करत आहेत. 'आलीया भोगासी ...' न म्हणता.
आपण पाडतो आहोत का हो इतक्या प्रामाणिकपणे आपल्या जबाबदाऱ्या पार ?
आहो, मग घरात बसणे ही सध्या आपल्या जबाबदाऱ्यांमधीलच एक जबाबदारी आहे. आनंदाने पार पाडुयात की मग हा जबाबदारीचा एकांतवास.
कळावे, लोभ असावा.
-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:
Post a Comment