मै चली मै चली,
देखो प्यार की गली ...
काही लोक आयुष्यात एकदाच प्रेमात पडतात, काही एकदाही नाही, काही मनातल्या मनात अनेकदा तर काही सरेआम खुल्लमखुल्ल वारंवार. त्यांनाच बहुदा 'मोठ्या मनाचे लोक' वगैरे म्हणत असावेत. मी ह्या 'मोठ्या मनाच्या' पंगतीत मोडते. 'एक से मेरा क्या होगा कालिया' हे आमचे ब्रीदवाक्य. बर प्रकार तरी किती , एकाचा दुसऱ्याला पायपोस नाही. एक प्रेम उत्तर तर एक दक्षिण. नानाविध प्रकारांचे , आकारांचे , रंगांचे इंद्रधनुष्यचं.
पाहिले प्रेम अर्थात 'सायकल'. आपल्याला आतून काहीतरी प्रचंड आवडू शकते हे सायकल ने पहिल्यांदा अनुभव करून दिले. एकदा हात धरला ते आयुष्यभरासाठीच. वाटले आता बस , अजून कोणीच नाही ,फक्त मी आणि माझी सायकल.
पण नाही, दोघात तिसरा यायचा होताच. आमच मजेत चालल होत आणि .... आपल्याला अजून कशानेतरी आतून उकळ्या फुटतात हे कळाले. 'चित्रकला' बरी आहे हे चौथीला बक्षीस मिळाले तेव्हाच कळाले होते. फक्त कळाले होते, ओळख नुसती. पण आई ने मराठे सरांकडे जपानला चित्र पाठवायचे आहे त्याच्या सरावासाठी पाठवले आणि घात झाला. सर तेव्हा जे काही बोलले, जे काही शिकवले त्याने चित्रकला हृदयाच्या आरपार गेली .... ती कायमचीच.
आता तरी थांबावे ना ...पण नाही. त्याला ही मी जबाबदार नाही. सरस्वती कॉलनी च्या गणपतीच्या स्नेहसम्मेलनात 'नृत्य' बसवताना सुनीता म्हणाली की ही छान करते, हीचे बघून करा .... आणि काटा रुतला. कार्यक्रम झाल्यावर आई ला पण असेच वाटले की बरी नाचते. झाले ... खुंटी हलवून घट्ट झाली. नितीन कुलकर्णी सरांच्या कथक शिकवण्याने नृत्य प्रेमाला मखरात नेऊन बसवले आणि नृत्याने पट्टराणी बनून मनावर कायमचे राज्य केले.
संपूर्ण आयुष्य नृत्य करायचे आणि चित्रकलेत पदवी घ्यायची हे ठरले.... ठरले म्हणजे ठरले, त्यात काही बदल नाही. आता कोणालाही तिसर्याला हृदयात प्रवेश द्यायचा नाही. हम दो ( मी आणि सायकल, हमारे दो (चित्र आणि नृत्य) बास. राजे ... घात झाला. ठाकूर मॅडम च्या शिकवणीच्या निमित्ताने पुन्हा ' आंखे चार हो गई'. मॅडम ची नजर चोरून 'गणित' हळूच आत पाझरले. शिकवणीचे निमित्त , आमच्या रोज गाठीभेटी होऊ लागल्या, हळू हळू आमच्यातील अंतर इतके कमी झाले की नुसत्या एका नजरेत उत्तर जन्माला येऊ लागले. मनाचा ठाव घेणे म्हणजे काय ह्याचा अनुभव गणिताने दिला.
त्यामुळेच बहुदा अकरावी ला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. विज्ञाना बरोबर मराठी आणि इंग्रजी भाषा पण असायच्या , भाषा म्हणजे निबंध आलाच. आला तसा लिहिला. मराठी शिकवणाऱ्या शिक्षिका (BA) कला शाखेला शिकवायच्या. निबंध त्यांना इतका आवडला की त्यांनी कला शाखेच्या मुलांना वर्गात वाचायला तर दिलाच शिवाय मला भेटायला ही बोलावले ... दगा दगा दगा . तिथून जे पेन आणि कागद मनाच्या कोपऱ्यात हळूच सरकून बसले ते बसलेच.
ह्या सर्व प्रकारामुळेच की काय ,बारावी नंतर विज्ञानाला राम राम ठोकून कला शाखेला जवळ केले. NSS च्या निमित्ताने सरांना काय साक्षात्कार झाला असेल माहीत नाही, तू चांगले बोलतेस, हिंदी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे त्याचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन करशील...... आणि वाघाच्या तोंडाला रक्त लागले. एका नवीन प्रकाराची ओळख झाली. तोपर्यंत बोलणे म्हणजे फक्त बडबड आणि गप्पा. त्याला एक वळण लागले. त्या वळणाचे एक टोक सरळ हृदयाच्या आत जाऊन कायमचेच रुतून बसले.
ह्या सर्व गुंत्यात गुंतले असताना एक दिवस शिल्पा ने लुना हातात दिली. चालव ... सोप्पी आहे. लुना चालवायला फक्त सोपीच नाही तर कसली धम्माल आहे हे कळाले. सायकल कडे कानाडोळा करून लुनावर भटकणे वाढले. नगरला गेले असता शशांकने मोटारसायकलशी ओळख करून दिली आणि पुन्हा स्नेहबंधनात अडकायला झाले. गाडी चालवायला कधी जमलीच नाही, ती उडवायलाच मजा यायची. एकदाही आमच्यात भांडण, रुसवा फुगवा होऊन तिने कधी तोंडावर आपटले नाही. गुण्या गोविंदाने आम्ही एकमेकांच्या साथीने अक्षरशः बागडलो.
मोठं मोठं म्हणजे किती मोठ मन असावे? .... इथपर्यंत सगळं ठीक होते, दुचाकीमुळे सायकल वर थोडा अन्याय झाला पण तरीही सगळे हातात हात घालून गुण्या गोविंदाने नांदत होतो. कुठून तरी टूम निघाली, चार चाकी शिकूयात...... शिकण्याचे फक्त निमित्त. तिने कधी संपूर्ण आयुष्याचा ताबा घेतला कळलेच नाही. ओळख बनून गेली माझी. आता आता तर लोक 'तू दिसली होतीस' न म्हणता 'तुझी गाडी दिसली होती' असेच म्हणतात. सगळे माहीत असते तिला. कधी कोणी वाईट नजरेने पाहिले , खास करून दुचाकीने , की ही त्याला सरळ आपल्या अंगावर घेते आणि मला वाचवते. किती जखमा, किती झीज झाली असेल तिची ह्या नात्यात पण कधी कुरकुर करून बंद पडणे नाही. कधी राग राग करून कोणाला ठोकणे नाही. कितीही लांब न्या, विनातक्रार सोबतीला तयार ही जिवनसंगिनी.
ह्या सगळ्या प्रेम प्रकरणांना एकटी मी कारणीभूत नाहीये. हे सगळे नानाविध प्रकार दिले आहेत पालकांनी आणि फुंकर घालून अग्नी भडकवला आहे शिक्षकांनी. मनाच्या 'मोठ्ठेपणात' त्यांचा सिंहाचा वाटा आहे.... काय पाठीमागे नावं ठेवायची असतील ते सगळ्यांना मिळून ठेवावीत.
कळावे, लोभ असावा.
- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:
Post a Comment