सांग सांग भोलानाथ,
शाळेभोवती तळे साठून सुट्टी मिळेल का?
बऱ्याच जणांना शाळा मनापासून आवडते तर काहींना अगदी मनापासून कंटाळा असतो. कारण काहीच नाही ... किंवा कहीही चालते. शाळा सकाळी असते, लवकर उठावे लागते पासून अभ्यास झाला नाही, पोट दुखते, डोके दुखते, उशीर झाला काहीही. शाळा न अवडण्याचे कारण एखादा विषय असू शकते असे जर म्हंटले तर विश्वास बसेल ??
भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि गायन हे ते तीन शत्रू शाळेच्या आणि बालमनाच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये भिंत निर्माण करतात. अंदाजे अर्ध आयुष्य संपल्यावर पण ह्या तीनही विषयांचा कुठेही इतकासाही उपयोग झाल्याचे काही स्मरत नाही. ज्या विषयांवाचून पुढे काहीही अडणार नाही ते विषय शिकवून किंवा शिकायला लावून कोणाचे काय भले होत असते ? शास्त्राच्या आणि गायनाच्या शिक्षकांना नोकरी मिळावी म्हणून आमच्यावर अन्याय का ??
मुलांना आवडतील असे विषय शिकवावेत ना... भाषा विषय ३ काय ४ ठेवा, गणित(गरजेचेच आहे) त्यातही सोप्पे (मूलभूत) आणि अवघड (प्रगत)असे २ प्रकार करता येतील, भूगोल( हिंडाफिरायला कामास येतो) आणि प्रकल्प ( जरा अवघड शब्द आहे ,आपण सोपे करून प्रोजेक्ट म्हणू) करायला दिले तर मुले आनंदाने करतील , इतिहास (गोष्टी रूपाने फक्त) तो ही आपला खरा खुरा इतिहास, मुघल आणि इंग्रजांपासूनचा नाही. राज्यसेवा परीक्षा देणाऱ्यांव्यतिरिक्त चौल घराणे किती लोकांना माहीत आहे ? वेद किती शाळेत शिकवले / ऐकवले जातात? आपण कसे हरलो आणि मुघल आणि इंग्रजांनी कसे आपल्याला नागवले किती वर्षे हा पराभवाचा इतिहास शिकणार ? आणि काय मजा येणार आहे ते शिकण्यात? त्या आधीचा संपन्न , समृद्ध इतिहास कळू देत ना विद्यार्थ्यांना , त्यांनाही मजा येईल ऐकायला. मुघल आणि इंग्रज आल्यावर त्यांना आपल्या ज्या ज्या राजांनी आणि नेत्यांनी नामोहरम केले तेवढाच भाग येऊ देत ना धड्यात. विजयाचा इतिहास शिकून लढवैय्ये नागरिक घडू देत की. ऐकायलाही मज्जा येईल आणि परीक्षा द्यायची नाही म्हंटल्यावर लक्षात पण चांगले राहील. रशियन राज्यक्रांती मी का घोकावी? इंग्लंड ला पहिला दुसरा तिसरा कितीही विल्स नाहीतर विल्यम होऊ देत, मी का त्याची टिपणे ठेऊ ??
तीच गम्मत नागरिक शास्त्राची, जे पुढे जाऊन पावलोपावली वापरावे लागते त्याला फक्त २० गुण, कसे चांगले नागरिक तयार होणार?? नागरिक शास्त्र आणि कायद्याची समज असणारा विद्यार्थीच पुढे जाऊन आदर्श नागरिक बनू शकतो. पण जर हे नागरिकशास्त्र माहितीरुपात शिकवले गेले तरच मुलं न कंटाळता ऐकतील आणि लक्षात ठेवतील. २ तासात संपूर्ण नागरिक शास्त्र गुंडाळल्यावर काय मज्जा येणार हो ते शिकण्याची आणि समजण्याची. नाही समजले की टाक ऑप्शन ला( पर्यायी प्रश्न).
वनस्पती शास्त्राची मात्र मज्जा असते ,खूप सगळी फुले ,पाने ,प्राणी असल्याने आणि भरपूर गुण आकृतीला मिळत असल्याने त्याला विद्यार्थी मान्यता आपोआपच मिळते. एकतर बरीच फुले, पाने , प्राणी आपल्या आयुष्याचा भाग असतात आणि आवडतही असतात त्यामुळे बहुदा वनस्पती शास्त्राचा तास आणि अभ्यास आवडीने केला जातो. पण ते रसायन आणि भौतिक शास्त्राचे तास आणि त्या आंबट वासाच्या प्रयोग शाळांमध्ये जायचे म्हणजे फाशीचा कैदी जसा वध स्तंभाकडे जाईल तशी पावले जड होत असतात. कित्येक हुशार मुलांना केवळ हे २ शत्रू विषय येत नाही म्हणून 'ढ' ठरवले जाते. एवढी सर्कस करून पुढे त्याचा उपयोग काय तर त्याच विषयाचा शिक्षक नाहीतर अभियंता होता येते. त्याचे प्रमाण फक्त २%, त्या इनमिन २ टक्क्यांसाठी सगळ्यांचा बळी का?
खेळ , शारीरिक कसरती रोज दोन तास घ्या ना , आम्ही न रडता न कंटाळता शाळेत येऊ. पण त्याला पूर्ण आठवड्यात फक्त २ तास. सगळ्यात कहर असतो तो संगीत विषयाचा. कोणतीही कला ही दैवी देणगी असते, ती जन्मजात यावी लागते , वगैरे वाक्य शाळेच्या पाठ्यक्रमात संगीत घुसवताना कुठे हरवतात ?? कोण कुठला राग, कसला आरोह कोणत्या अवरोहाबरोबर खायचा काही तपास लागत नाही, सारेगमप सरळ न म्हणता मध्ये काही स्वर का खायचे , त्यांना उगाच वर खाली करून वेगळा 'राग' असे नामकरण का करायचे ? आवाज बरा असो , नसो अख्ख्या वर्गाने भसाड्या आवाजात समूह गीत गावे तसे ते राग आळवायचे. 'देवी भजो दुर्गा भवानी....' काय सुख असते हे असे जबरदस्ती गाणे एखाद्याच्या नरड्यात ओतण्यात? वरून 'गाणे गातात, कविता म्हणतात, तू गाणे म्हणते आहेस, गात नाही आहेस,हे कळतंय का तुला' असा शेरा. आहो माझे काही म्हणणे नाही, गा नाहीतर म्हणा पण मला सोडा असे जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटले तर त्यात त्याची काय चूक ?
कला मग ती कोणतीही असो चित्रकला, नृत्यकला, हस्तकला, गायन, वादन हे ऐच्छिकच असले पाहिजे. ४ भाषा, एखादी कला, गणित, गोष्टीरूपी इतिहास, प्रोजेक्ट साठी भूगोल ( घरून करून आणायला सांगायचा नाही), शारीरिक शिक्षण आणि खेळ, आणि ३ पैकी एकच कोणतेतरी विज्ञान तेही ऐच्छिक आणि हल्ली संगणक ( भाषा म्हणून नाही तर व्यावहारिक वापरासाठी) असे विषय असतील तर कोण कशाला शाळा बुडवेल ?? ढ , हुशार, बुद्धिमान अशी वर्गवारी पण होणार नाही. विषय आवडीचे असल्यामुळे सगळेच हुशार मग नापास होण्याचा ताण नाही आणि शाळा बुडवण्याची गरज पण नाही.
एखादा कौशल्याचाही विषय टाकायला हरकत नाही. सुतारकाम, माती काम(मडके,दिवे बनवणे), इ मजा येईल शिकायला.
अजून एक... घोडदौड आणि लष्कराचे शिक्षण जर अनिवार्य केले तर ... मी स्वप्न तर बघत नाही ना???
मुलगी दहावीला आहे,ती उत्तीर्ण झाली की माझा सर्वार्थाने शाळेशी सम्बन्ध संपणार.... सुटलो एकदाचे.
कळावे, लोभ असावा.
- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:
Post a Comment