गाडगेबाबांचा एकच मंत्र
स्वच्छतेचे जाणा तंत्र
'सध्याच्या परिस्थितीत एकतर सगळे काम घरी त्यात हल्ली ह्या भाज्या आणि फळे पण धुवावी लागतात, कटकट नुसती' ह्या बोलण्याने उडालेच. म्हणजे एरवी धुत नाहीत? तसेच धूळ, धूर, घाणीसह फ्रीज मध्ये ?? असते तरी कितिकशी भाजी, दोन (२) पिशव्या?? मॉलचा अपवाद वगळता, साधारणपणे भाजी किंवा फळे ही रस्त्याच्या कडेला किंवा भाजी मंडईत उघड्यावर विक्रीस ठेवलेली असतात. गाड्यांचा कार्बन, रस्त्यावरची धूळ, लोकांनी जागोजागी टाकलेली पिंक, तिचे उडालेले कण, कोणी नाक साफ केले असते त्याचे शिंतोडे काय काय नाही बरोबर घेऊन येत तुमची भाजी आणि फळे. त्यांना न धुता तसेच फ्रीज मध्ये बाहेरची सगळी घाण आतल्या सगळ्या सदस्यांना वाटायला पाठवायचे??? आणि मग काय 'पडू आजारी, मौज हीच वाटे भारी'.
आमच्याकडे भाजी घरी येणे हा एक सोहळा असतो. प्रत्येकच शेतकऱ्याच्या घरी, जो वस्तीवर न राहता शेतापासून जरा लांब गावात रहातो, त्यांच्याकडे साधारण सारखच चित्र असत. वस्तीवर राहणार्यांना भाजीपाला आणणे असले काही प्रकरण नसते. कढई ठेवली आणि तेल तापेपर्यंत भाजी खुडली तरी भागत. शेतावरून भाजी आली, हे वाक्य वाचताना डोळ्यासमोर दोन(२) लहान पोती आणावीत, आपल्या शहरासारख्या पिशव्या नाहीत. १०/१२ कवठ, ढीगभर चिंचा, २५/३० चिक्कू, ७/८ मोठे टरबूज, ५/६ लहान टरबूज, ५/६ खरबूज, ५/६ रामफळ, १०/१२ सीताफळ, २५/३० कैऱ्या, १५/१६ काकड्या, २५/३० लिंब, ७/८ पेर ऊस, केळाचा अख्खा घड अशी सर्वसाधारण फळ असतात. सध्याचा हंगाम लक्षात घेता ह्या फळांची नावे लिहिली. भाज्यांमध्ये ३/४ किलो वांगी, ३/४ किलो टोमॅटो, २/३ किलो मिरच्या, ३-३ जुड्या प्रत्येकी पालक, मेथी, कांद्याची पात, कोथिंबीर, करडई, आळू, २/४ गड्डे कोबी, फ्लॉवर, इ प्रकार. कांद्याचे १० किलो चे पोते वेगळे, लसणाची 3/4 किलोची पिशवी वेगळी. हे सगळं दोन (२) पोत्यातून घरी येत. एकदा हा जामानिमा घरी आला की आई त्याचे वाटे करणार आणि तेव्हा जे कोणी घरी असेल त्याने कॉलनी मध्ये सगळ्या घरी वाटप करून यायची जबाबदारी पार पाडायची असा दंडक असे. जे घरासाठी म्हणून वेगळे काढून ठेवले असेल ते लावणे हे एक दिव्य असते. मिरच्यांची देठ खुडून, धुवून, सुकवून एखाद्या रिकाम्या चॉकलेट च्या किंवा मिठाईच्या डब्यात खाली पेपर घालून मिरच्याना बंदिस्त करून फ्रीज मध्ये पाठवले जाते. सगळ्या पालेभाज्या नीट स्वच्छ करून, निवडून पेपर मध्ये गुंडाळून विराजमान होत. कांद्याची-लसणाची पात, आळू (भाजीचा)नीट कापून, वडीचा दुमडून डब्यात स्थानापन्न होई. लिंबू, कोथिंबीर, आलं त्यांच्या त्यांच्या डब्यात स्वच्छ होऊन, सुकवून जाऊन बसत. साधारण हे आणि असेच सर्व भाज्या आणि फळांना नियमात बसवून मगच फ्रीज चा मान मिळत असे. फळांची अजूनच तऱ्हा निराळी. पिकलेली खाण्यास तयार फळे आणि कच्ची फळे वेगळी काढायची. कच्च्या फळांना आढीचा मान. पिकलेल्यांना धुवून नीट फळांच्या ट्रे मध्ये हारीने लावून ठेवायचे. ज्यांना दत्तक द्यायचे आहे त्यांच्या पिशव्या वेगळ्या भरायच्या. कॉलनी मध्ये वाटप करून यायचे. इतके सगळे झाले म्हणजे सम्पले का ? तर नाही . नेमके शिकवणी किंवा शाळेच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर कोणीतरी ओळखीचे रहात असते, आमच्याच शाळेत आईची एखादी मैत्रीण शिक्षिका असे, तिने आवर्जून 'अमुक एक गोष्ट नक्की पाठवशील' असे सांगितलेले असते. मग दुसऱ्या दिवशी तो सगळा 'वानवळा' घेऊन शाळेच्या दप्तराची कसरत करत इप्सित व्यक्तीपर्यंत पोहोचवला जायचा. नेमके रस्त्याने कोणी भेटे किंवा शाळेतील कोणी दुसरी शिक्षिका हे बघे आणि 'वाहिनीना उद्या माझ्यासाठी पण पाठवायला सांगशील' असा हक्काचा वटहुकूम घेऊन हुजरे संध्याकाळी घरी येत आणि निरोप सांगायचा साफ विसरून जात. आईची आणि ह्या व्यक्तींची गाठ पडून आईचा ओरडा पडेपर्यंत परत दोन(२) पोते भाजी आणि फळे घराचा उंबरा ओलांडत.
'खेडेगावात काय लोक असतात हाताशी कामाला', असेही कोणी म्हणू शकते. असतात ना... पण ह्या कामाला नाही. हे घरातल्यानीच पार पाडायचे सोपस्कार आहेत. आणि शहरात तुलनेने कितीकशी भाजी येते, तीही आठ (८) दिवसातून एकदा. तिला साफ करायला वेळ तो काय लागणार ?? आणि भाजी स्वच्छ करणे हे फक्त गृहिणीचेच काम आहे असा काही ह्या कामावर शिक्का पण नाही. घरातील कोणीही अगदी कळत्या वयातील मुले, आशीर्वाद देणारे हात किंवा पुरुष मंडळींची सुध्दा ह्या कामात मदत होऊ शकते.
'हल्ली हात-पाय धुतल्याशिवाय मी घरात कोणाला येऊच देत नाही' हे एक असेच चमत्कारिक वाक्य. हल्ली ?? जसे समजायला लागले तसे आठवते, पायावर पाणी न घेता घरात किंवा स्वयंपाकघरात पाय ठेवताच तोफखाना लगेच सुरू होत असे. जसे काही आम्ही खून करून तलवारीला रक्त तसेच ठेवून घरात शिरलोय इतका गहजब माताश्री करायच्या. ह्या कटकारस्थानात आजी-आजोबा आणि बाबा सगळे तीला सामील. हे तर जाऊच देत. घरातल्या घरात स्वच्छ पायाने वावरणारे घरातील बिचारे बालकलाकार जबरदस्तीने परवचा आणि पाढे म्हणण्याच्या शिक्षेच्या आधी पुन्हा हात-पाय धुवायला पाठवले जात. कडाक्याच्या हिवाळ्यात सुदधा. नंतर परवचा म्हणताना शेकोटीचा/ शेगडी चा मान मिळे ही गोष्ट अलाहिदा. ठेवणीतले तिखट, मसाले, हळद, पापड-कुरडया, लोणच्याची बरणी ह्या सगळ्यांना हात लावण्या आधी हा धुवाधुवीचा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जात असे.
शेवटी प्रश्न आरोग्याचा आहे. काळजी घ्यावी, नाहीतर आमच्या रेवाताई ची लाडकी कविता आहेच 'पडू आजारी, मौज हीच वाटे भारी'
कळावे, लोभ असावा.
- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:
Post a Comment